पर्शियन गल्फच्या किनाऱ्यावर वसलेले दुबई हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
UAE (United Arab Emirates) हा मध्य आशियातील म्हणजेच अबू धाबी, दुबई, शारजाह, रस अल खैमा, अजमान, उम अल क्वेन आणि फुजैराह या 7 छोट्या अमीराती पासून बनलेला देश आहे. 1873 ते 1947 म्हणजेचं भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा देश ब्रिटिश इंडियाच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर याचे शासन लंडनच्या विदेश विभागाकडून चालत होते. 2 डिसेंबर 1971 रोजी सर्व अमीराती अबू धाबीच्या राजाच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आणि त्यांनी UAE ची स्थापना केली.
दुबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्या शहराची श्रीमंती. आज जे जगाचं ‘फायनान्शियल सेंटर’ म्हणून ओळखलं जातं. महत्वाकांक्षा आणि आर्थिक स्थिती उत्तम असेल तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात, आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून दुबईचं नाव घेता येईल.
